जळगाव : शेतकऱ्यांप्रती सरकार असंवदेनशील; आमदार एकनाथ खडसेंची टीका | पुढारी

जळगाव : शेतकऱ्यांप्रती सरकार असंवदेनशील; आमदार एकनाथ खडसेंची टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सत्तेवर आलेल्या सरकारला सरकारच्या प्रश्नांवर देणे-घेणे नाही. त्यातच सरकारमधील मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांप्रती संवेदना असल्यास सत्तारांकडून त्या वक्तव्याबाबत खुलासा घ्यावा, असे स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी विधी मंडळातील नेतेपदी निवड झाल्यामुळे भुसावळ शहरात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी माध्यमांनी संवाद साधला असता सरकारवर टिका केली. खडसे म्हणाले की, विधी मंडळात गटनेतेपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असून या निवडीचा फायदा आगामी काळात पक्षाला निश्चित होणार आहे तसेच पक्षाचे बळदेखील वाढणार आहे.

सरकारने उपाययोजना कराव्या…
राज्यातील कापूस उत्पादक संघटीत नसल्याने कापसाला भाव नाही, असेही खडसे यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या करतात हे नवीन नाही, या मंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप नोंदवत सरकारमधील जवाबदार मंत्र्यांनी न शोभणारे विधान केले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याऐवजी असे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button