नाशिक : 'साहेबांच्या बदलीने पोलिस कर्मचारी भावुक, पाणवल्या डोळ्याच्या कडा

दातली (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे बदली झालेले पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या बदलीने सोबत काम करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. जालना येथून बदली होऊन आलेले पोलिस निरीक्षक चौधरी हे २ वर्ष ३ महिने सिन्नरकरांच्या सेवेत होते.
सेवेच्या कालावधीत चौधरी यांनी केलेले काम, त्यांची कार्यशैली, पोलिसपाटील तसेच पोलिस ठाण्यात आलेल्या नागरिकांसोबत जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध निर्माण केले. सहकाऱ्यांना चांगली वागणूक दिली.
चौधरी वेळेप्रसंगी गुन्हेगारांचा कर्दनकाळही झाले. मनमिळाऊ आणि सोज्वळ अधिकाऱ्याला निरोप देताना पोलिस ठाण्यातील पोलिस दादा, महिला कर्मचारी भावुक झालेले दिसले.
हेही वाचा :
- छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल
- पिंपरी : आधारकार्डची प्रक्रिया आता झाली सोपी
- पिंपरी : नाटके कमी; इतर कार्यक्रमांनीच नाट्यगृहांचा भरतोय गल्ला