महिला दिन विशेष : शहराचे पर्यावरण टिकविण्यासाठी "प्लॉगर्सची महिला शक्ती' | पुढारी

महिला दिन विशेष : शहराचे पर्यावरण टिकविण्यासाठी "प्लॉगर्सची महिला शक्ती'

नाशिक : वैभव कातकाडे

तीन वर्षांपूर्वी पांडवलेणी येथे मित्रांसोबत फिरताना तेथे साचलेल्या कचऱ्याचे एकत्रीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले. तेथे साचलेला कचरा ३५ ते ४० बिनबॅग एवढा होता. तेथूनच तेजस तलवारे या तरुणाने नाशिक प्लॉगर्स या ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीपासूनच या ग्रुपमध्ये तरुणींची संख्या जास्त आहे. आज या संस्थेत जवळपास ८०० स्वयंसेवक असून, त्यात निम्म्याहून अधिक महिला आहेत.

संस्था स्थापना करतेवेळी असलेले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत आठवड्याच्या शेवटी न चुकता हा ग्रुप स्वच्छतेचा ड्राइव्ह घेत असतो. त्यासाठी सर्व सदस्य दिवसातून १० मिनिटे एखाद्या विषयावर चर्चा करतात. आठवड्यातील महत्त्वाच्या दिवसाचे वैशिष्ट्य साधत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत असतात. यंदादेखील महिला दिनानिमित्त दि. १२ मार्च रोजी स्वच्छतेचा २०२ वा ड्राइव्ह हा ग्रुप घेणार आहे.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही दर वीकेंडला काम करत आहोत. आतापर्यंत ‘नाशिक प्लॉगर्स’ने २०१ स्वच्छतेचे ड्राइव्ह घेतले आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी आम्ही बांधिल आहोत. त्यादृष्टीने आम्ही नियमित काम करत आहोत.

– सई पाटील, अध्यक्ष, नाशिक प्लॉगर्स ग्रुप

हेही वाचा :

Back to top button