नाशिक : आजी-माजी आमदारांच्या पॅनलमध्ये सरळ लढत; 12 मार्चला मतदान | पुढारी

नाशिक : आजी-माजी आमदारांच्या पॅनलमध्ये सरळ लढत; 12 मार्चला मतदान

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या समर्थकांमध्ये सरळ लढत होत असून, 13 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत.

सोसायटी गटाच्या 7 जागांसाठी आमदार कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनलच्या रामनाथ कर्पे (वावी), युवराज तुपे (बेलू), भागवत चव्हाणके (किर्तांगळी), संजय गोराणे (शहा), नितीन आव्हाड (वडगाव-सिन्नर), माणिक गडाख (देवपूर), माधव आव्हाड यांचा सामना माजी आमदार वाजे, युवा नेते सांगळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलचे छबू थोरात (पंचाळे), कैलास कातकाडे (केपानगर), ज्ञानेश्वर बोडके (सोनांबे), रामदास दळवी (विंचूरदळवी), अमित पानसरे (ठाणगाव), ताराबाई कोकाटे (खडांगळी), सुखदेव वाजे (पांढुर्ली) यांच्याशी होत आहे. व्यक्तिगत प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी सहकार विकास पॅनलचे कैलास निरगुडे (पांगरी), अजय सानप (मानोरी) यांची लढत जनसेवा पॅनलच्या विशाल आव्हाड (दापूर), पोपट सिरसाट (मुसळगाव) यांच्याशी होत आहे. महिला प्रतिनिधीच्या दोन जागांसाठी सहकार विकास पॅनलच्या हिराबाई उगले (पाटपिंप्री), शांताबाई कहांडळ (कहांडळवाडी) व जनसेवा पॅनलच्या सुशीला राजेभोसले (वावी), निशा वारुंगसे (डुबेरे) या आमने-सामने आहेत. कृषी निगडित संस्थेच्या एका जागेसाठी सहकार विकास पॅनलचे अरुण वाजे (पांढुर्ली) व जनसेवा पॅनलचे विठ्ठल राजेभोसले (वावी) यांच्यात लढत होत असून, अनुसूचित जाती-जमातीच्या जागेसाठी सहकार विकास पॅनलचे राजेश नवाळे व जनसेवा पॅनलचे रावसाहेब आढाव यांच्यात झुंज होत आहे. 12 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी व्यक्तिगत मतदार 761, सोसायटी गटात 97, तर संलग्न कृषी निगडित मतदारांची संख्या 18 आहे.

हेही वाचा:

Back to top button