बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे | पुढारी

बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत सविस्तर चर्चा होऊन महासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी महत्वाच्या मागण्या मान्य केल्यामुळे महासंघ नियामक मंडळाने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले आहे. अशी माहिती राज्य महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ संजय शिंदे यांनी दिली.

पुढील मागण्या मान्य केल्या

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या विनाअनुदानित, अंशुता अनुदानीत, अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी
उप मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना शासनाने ठरविलेल्या धोरणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल.

२) १०-२० -३० वर्षांनंतरची सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्या येईल. व त्या बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे आजच सादर करण्यात आला.

३) २१४ व्यापगत पदाना उच्च स्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली असून त्या बाबतचा शासन आदेश १५ दिवसात निर्गमित करण्यात येईल तर उर्वरित कार्यरत असलेल्या वाढीव पदावरील शिक्षकांना अधिवेशन काळातच उच्च स्तरीय सचिव बैठक आयोजित करून मान्यता देण्यात येईल.

४) आय टी विषय नियुक्ती मान्यता प्राप्त शिक्षकांना अनुदानित पद मान्यता व वेतनश्रेणी लागू करण्यात बाबत वित्त विभागाकडे पुढील १५ दिवसात प्रस्ताव सादर केला जाईल.

५) अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याबाबत महासंघाने आवश्यक सुधारणा शिक्षण विभागाकडे सादर करण्यात याव्यात.

६) शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

७) कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीसाठी विद्यार्थी संख्येचे निकष शासनाने पूर्वी मान्य केल्या प्रमाणेच असतील.

८) १ डिसेंबर २०२२ रोजी प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून मान्यता देण्यात येईल.

९)DCPS/NPS चे हिशोब शिक्षकांना मार्च २०२३ अखेर देण्यात येतील.

इतर मागण्यांबाबत अर्थ संकल्पिय अधिवेशन संपल्यानंतर बैठक आयोजित करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार आहे. याप्रसंगी शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, मुख्य सचिव रणजित सिंह देओल, सहसचिव काझी, उपसचिव समीर सावंत, उपसचिव तुषार महाजन, राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी, संचालक पाटील, राज्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, समन्वयक मुकुंद आंदळकर, सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे, कार्याध्यक्ष अविनाश तळेकर, उपाध्यक्ष विलास जाधव, अविनाश बोर्डे, अशोक गव्हाणकर, सुनील पूर्णपत्रे उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button