धंगेकरांच्या विजयाने दौंड मध्ये आनंद; तालुक्याला मिळाले दोन आमदार | पुढारी

धंगेकरांच्या विजयाने दौंड मध्ये आनंद; तालुक्याला मिळाले दोन आमदार

राहु; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे दौंड तालुक्यात आनंद झाला आहे. दौंड तालुक्यातील नाथाची वाडी येथील आहेत, तेथे त्यांचे घर ,शेतजमीन आहे. पहिला फेरीपासूनच निर्णायक आघाडी मिळाल्यानंतर रविंद्र धंगेकर यांचे मूळ गाव असलेल्या नाथाची वाडी (ता.दौंड) येथे समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाक्याची आताषबाजी केली विजय उत्सव साजरा केला. रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने दौंड तालुक्याला दुसरा आमदार मिळाला आहे.

रवींद्र धंगेकर यांचा विजयामुळे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत परिसर दुमदुमून टाकला. रवींद्र धंगेकर यांचं मूळ गाव दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी (पिंपळगाव) हे असून त्यांची वडीलोपार्जित शेत जमीन व घर देखील तेथे आहे. त्यांचं मूळ आडनाव हे झाडगे असून त्यांचे वडील हेमराज हे पुण्यात धंगेकर कुटुंबात दत्तक गेले आहेत. हेमराज हे सोने चांदीचे कारागीर म्हणून ओळखले जातात. नगरसेवक पदावर असताना आपल्या मूळ गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धंगेकर यांनी प्रयत्न केले आहेत.

दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी या गावात त्यांनी विविध विकास कामांना निधी मिळवून दिला असून गावच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होतं असतात. महाविकास आघाडी कडून कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी रवींद्र धगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाथाचीवाडी या गावात जल्लोष करण्यात आला. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत नाथाचीवाडीतील ग्रामस्थ कसब्यात तळ ठोकून होते. कसब्याच्या निवडणुकीची चर्चा दौंड तालुक्यात सुरु मोठ्या प्रमाणावर होती. दौंड तालुक्यात भाजपचे राहुल कुल हे विद्यमान आमदार आहेत तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या रूपाने तालुक्याला दुसरा आमदार मिळाला आहे.

भाचीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेत असताना रविंद्रभाऊ स्वत आले आणि आमचे काम निशुल्क झाले.जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटणारा माणुस निवडुन येणारच होता

                                  -महेंद्र रासकर,जय जगताप

ग्रामस्थ नाथाची वाडी
नाथाची वाडी ता.दौड येथील रविंद्र धगेंकर यांचे निवासस्थान
२)नाथाची वाडी येथे फटाक्याची आतषबाजी करताना कार्यकर्ते

Back to top button