Nashik Crime : ट्रेडिंग कार्यालय फोडून दीड लाखांची रोकड केली लंपास | पुढारी

Nashik Crime : ट्रेडिंग कार्यालय फोडून दीड लाखांची रोकड केली लंपास

ट्रेडिंग कार्यालयातून रोकड लंपास

नाशिक : उपनगर येथील फ्रेन्ड कॉलनीतील एस. आर. ट्रेडिंग कार्यालयात दि. २६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान चोरट्याने एक लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. रामहरी शिवराम मुराद (३८, रा. जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने कार्यालय फोडून रोकड लंपास केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरापत काढून मारहाण

नाशिक : म्हसरूळ लिंक रोडवरील कणसारा माता चौक परिसरात संशयित राहुल बाळू घुले याने सदानंद काशीराय यादव (४०, रा. कणसारा माता चौक) यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. २६) सकाळी 9 च्या सुमारास संशयित राहुलने शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने वार करून दुखापत केली.

जुने नाशिकला एकास मारहाण

नाशिक : जुने नाशिक येथील बडी दर्गासमोरील परिसरात संशयित बाबू मुलतानी, अरबाजी मुलतानी, अयान मन्सुरी यांनी एकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. फवाद अलिमुद्दिन पिरजादे (२२, रा. बडी दर्गा) याच्या फिर्यादीनुसार, तीन संशयितांनी सोमवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास लोखंडी रॉडने मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकवासलातून शेतीला उन्हाळी आवर्तन

पैसे उधार न दिल्याने मारहाण

नाशिक : पैसे उधार न दिल्याने दोघांनी मिळून आदित्य लोंढे याला मारहाण केल्याची घटना देवळाली कॅम्प येथील संजय गांधीनगर झोपडपट्टी परिसरात घडली. रेखा लोंढे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गुड्डू उर्फ साजिद अन्वर शेख व नाजिम अन्वर शेख यांनी आदित्यकडे उसने पैसे मागितले होते. मात्र आदित्यने पैसे न दिल्याने संशयितांनी आदित्यला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनाच्या धडकेत एक ठार

नाशिक : द्वारकाकडून आडगावच्या दिशेने जाताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अमित कुमार सिंह (४४, रा. द्वारका) यांचा मृत्यू झाला. दि. २० फेब्रुुवारीला रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाला. त्यात गंभीर जखमी अमित कुमार यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button