Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनच्या सख्ख्या भावाचा खुलासा, ‘वहिनीने खूप काही सहन केलं’ | पुढारी

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनच्या सख्ख्या भावाचा खुलासा, 'वहिनीने खूप काही सहन केलं'

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास सिद्दीकीने वहिनी आलिया बद्दल मुलाखतीत खूप काही सांगितले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यामध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ शमास सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) एका मुलाखतीत आपला भाऊ आणि आलिया यांच्यातील सुरु असलेल्या वादाबद्दल खूप काही सांगितले आहे. (Nawazuddin Siddiqui)

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद आता कोर्टात पोहोचला आहे. आता आलियाने नवाजुद्दीनवर अत्याचाराचा आरोप केला होता. या प्रकारानंतर नवाजुद्दीनचा भाऊ शमास सिद्दीकीची मुलाखत समोर आली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनचा भाऊ म्हणाला, आलियाने एक महिला म्हणून खूप काही सहन केलं आहे. खूप काही सहन केलं आहे.

तलाकविषयी म्हणाला-

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाच्या घटस्फोटाबद्दल शमास म्हणाला, या वृत्ताबद्दल मला पारसं माहिती नाही.
दरम्यान, आलिया आणि नवाजुद्दीन यांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आलियाने सांगितले होते की, तिने घटस्फोटाच्या कुठल्याही पेपरवर सही केलेली नाही. शमास सिद्दीकीने मीडियाशी बातचीत करताना सांगितलं की, मी अनेकदा दोघांची भांडणे सोडवली आहेत. नवाज एकदम वेगळा माणूस आहे. तो जसा दिसतो, तसा नाही.

Back to top button