

नाशिक : जलसंपदा विभागातील सहायक अधिक्षकास दोघांनी कार्यालयात शिरून मारहाण, शिवीगाळ करीत धमकावल्याचा प्रकार सोमवारी (दि.१३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात प्रदीप राजाराम लोधे (५०) यांनी संशयित प्रशांत देवरे व प्रशांत धात्रक यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रदीप लोधे यांच्या फिर्यादीनुसार, दोघा संशयितांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सिंचन भवन येथे दोघे संशयित आले. त्यांनी लोधे यांच्या कार्यालयात शिरून तेथील लिपीक व लोधे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत संशयितांनी सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :