Nashik : मनमाड रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत | पुढारी

Nashik : मनमाड रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी मनमाड रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसचे अभूतपूर्व जल्लोषात स्वागत केले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सुहास कांदे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविल्या नंतर या दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्या. मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही मनमाड मार्गे जात असल्यामुळे तिच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण रेल्वे स्थानकावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. गाडीच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सुहास कांदे, रेल्वेचे अधिकारी कौशलेंद्र कुमार, राहुल अग्रवाल, प्रमोद सिंग, अनिलकुमार पाठक, नरेश्वर यादव, एस.व्ही.सुरवाडे, बी. एल. मीना, डी.डी. वाघ, आर.एस.गोसावी, आनंद गांगुर्डे, सचिन राजमलवार, सचिन महाजन, बी. पी कुशवाह, नितीन पांडे, जयकुमार फुलवानी, सचिन दराडे, पंकज खताळ, संदीप नरवडे, एकनाथ बोडखे, नितीन परदेशी, शिवसेनेचे साईनाथ गिडगे, मयूर बोरसे, फरहान खान, आरपीआयचे गंगाभाऊ त्रिभुवन, दिलीप नरवडे, कैलाश अहिरे, दिनकर धिवर, गुरूंकमार निकाळे, प्रमोद अहिरे यांच्यासह विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रात्री 8 वाजेच्या सुमारास प्लॅटफार्म 4 वर गाडीचे आगमन होताच उपस्थित लोकांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. मंत्री भारती पवार, आमदार सुहास कांदे यांनी चालकांचा सत्कार केला, त्यानंतर प्रवाशांसोबत संवाद साधला. त्यानंतर या दोघांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर एक्सप्रेस शिर्डीकडे रवाना झाली.

अशी आहेत या गाडीची वैशिष्ट्य :

वेगवान आणि अत्याधुनिक, सोयी सुविधांनी सुसज्ज अशी मुंबई-शिर्डी वंदे भारत ट्रेन आहे. भारताची ही पहिली सेमी हायस्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन असून त्यात प्रवास करण्याचा पहिला मान सरकारी शाळेतील दीडशे मुलांना मिळाला. त्यामुळे या विद्यार्थ्यांसमवेत त्यांचे पालक आणि शिक्षकही उपस्थित होते.

मनमाड मार्गे धावणाऱ्या ”वंदे भारत” एक्स्प्रेसच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासासाठी सर्व 1128 तिकीटे मोफत देण्यात आली होती. भुसावळ विभागाने यासाठी 600 तिकिटे जारी केली होती. माध्यम प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील इंजिनियर, उद्योजक, स्टेशन मास्तर, ट्रॅक मेंटेनर, कोच व एसी मेकॅनिक, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन कर्मचारी, ट्रेनमधील रेल्वे डॉक्टरांना ही तिकीटे देण्यात आली होती.

वंदे भारत गाडीसाठी मनमाड रेल्वे स्थानकावरून तिकीट देण्यात यावे अशी मागणी आपण रेल्वे मंत्र्याकडे केली असल्याचे मंत्री भारती पवार आणि आमदार सुहास कांदे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button