पुढारी ऑनलाइन डेस्क : Vande Bharat Express : भारतात लांबच लांब पल्ला गाठण्यासाठी शेकडो लोक रेल्वेचा वापर करतात. रेल्वेकडून हा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या आहे. वंदे भारत एक्सप्रेसमधील सुख सुविधा या अन्य रेल्वेपेक्षा अत्यंत आरामदायी आणि सुटसूटीत आहे. लांबच्या प्रवासात लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी सरकारने नवीन 'वंदे भारत एक्सप्रेस'मध्ये आता 'सापशिडी'चा लोकप्रिय खेळ लाँच केला आहे. हा गेम नवीन प्रगत वंदे भारत एक्सप्रेस 2.0 या गाड्यांमध्येच उपलब्ध असणार आहे. जाणून घ्या याची सविस्तर माहिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.10) मुंबई-सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या दोन गाड्यांमध्ये रेल्वेकडून ही नवीन सुविधा देण्यात आली आहे.
साप आणि शिडीचा खेळ सगळ्यात जुना आहे. हा जगभरात आणि भारतातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय खेळ आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच हा खेळ आवडतो. या खेळासोबत युवक, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जुन्या आठवणी जुळलेल्या असतात. तर लहान मुलांना हा खेळ खूप आवडतो. त्यामुळे रेल्वेत लांबचा प्रवास करत असताना लोकांचे मनोरंजन व्हावे, प्रवास रमत-गमत हसत-खेळत व्हावा, प्रवासा दरम्यान लोक गुंतून राहतील, यासाठी रेल्वेने हा गेम बोर्डवर देण्याचा निर्णय घेतला.
अधिकाऱ्यांनी निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ट्रेनच्या मार्गाप्रमाणेच हा खेळ आखला आहे. मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये, बोर्ड गेम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरू होईल आणि शिडी वंदे भारत ट्रेनने बदलण्यात येतील. ट्रेन जिथे थांबत नाही त्या बोर्डवर तुम्ही उतरलात, तर तुम्ही सापांमध्ये खाली जाल आणि जर तुम्ही थांब्यावर उतरलात तर वंदे भारत (शिडी) वरून उडी मारून उंच रांगांमध्ये जाल.
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत या एक्स्प्रेस गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन राष्ट्राला समर्पित करतांना अत्यंत आनंद होत आहे, असे उद्गारही त्यांनी काढले. तसेच या ट्रेनमुळे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी, सोलापुरचे सिध्देश्वर, शिर्डीचे साईबाबा, तुळजापूरची तुळजा भवानीचे दर्शन भक्तांसाठी सुलभ होणार आहे. तसेच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या अनुक्रमे भोर घाटातील खंडाळा-लोणावळा विभाग आणि थूल घाट म्हणजे कसारा घाटात बँकर इंजिनशिवाय 37 ग्रेडियंट घाट विभागात 1वर चढतील.
याशिवाय, ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक प्लग दरवाजे,
टच-फ्री स्लाइडिंग दरवाजे,
एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फिरणारी जागा,
प्रत्येक डब्यात 32 इंच प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टम,
प्रत्येक डब्यात आपत्कालीन प्रकाश व्यवस्था, आपत्कालीन टॉक-बॅक युनिट्स,
जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिवा,
दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष स्वच्छतागृह,
बायोव्हॅक्यूम टॉयलेट, चार प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे, कवच इ.