PM Modi: देशातील फिजिओथेरेपिस्टचे पंतप्रधानांकडून कौतुक | पुढारी

PM Modi: देशातील फिजिओथेरेपिस्टचे पंतप्रधानांकडून कौतुक

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी शनिवारी अहमदाबाद येथे आयोजित इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरेपिस्टच्या (आयएपी) ६० व्या अधिवेशनाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी देशातील फिजिओथेरेपिस्टच्या कार्याचे कौतुक केले. देशातील फिजिओथेरेपिस्ट आज आशेचे प्रतिक बनले आहेत. रुग्णाला वारंवार आवश्यकता पडणार नाही, असा उपचार करणारा फिजिओथेरेपिस्ट सर्वात चांगला असतो.

लोकांना आत्मनिर्भर बनवण्याचे त्यांचे लक्ष असते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करीत असतांना याच्या आवश्यकतेची प्रचिती येते, असे पंतप्रधान (PM Modi)  म्हणाले. जेव्हा कुठल्या व्यक्तीला अचानक दुखापत होते, तेव्हा त्यांच्यासाठी हा केवळ शारिरिकच नाही, तर एक मानसिक आघात देखील असतो. अशा वेळी फिजिओथेरेपिस्ट केवळ त्यांचा उपचार करीत नाहीत. तर त्यांचा आत्मविश्वास देखील वाढवतात. त्यांच्या ‘प्रोफशन’ आणि ‘प्रोफेशनलिज्म’मुळे बरीच प्रेरणा मिळते, अशा शब्दात पंतप्रधानांनी फिजिओथेरेपिस्टची स्तुती केली.

सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने फिजिओथेरेपिस्टला आयुष्मान भारत योजनेसोबत जोडले आहे. फिजिओथेरेपिस्ट सोबत योग जोडला. तर त्याची शक्ती अधिक पटीने वाढते. फिजिओथेरेपीसह योगाभ्यास असेल, तर कुशलता अधिक वाढते, असे पंतप्रधान म्हणाले. व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला देण्याच्या पद्धती देखील विकसित करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. तुर्कीमध्ये मोठा भूकंप झाला आहे. अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठ्या प्रमाणात फिजिओथेरेपिस्टची आवश्यकता असते. अशात मोबाईलच्या माध्यमातून आपल्या अनुभवामुळे बरीच मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button