नाशिक: श्रीक्षेत्र नगरसुल खंडेराव महाराजांचे भुजबळांनी घेतले दर्शन | पुढारी

नाशिक: श्रीक्षेत्र नगरसुल खंडेराव महाराजांचे भुजबळांनी घेतले दर्शन

नाशिक (नगरसुल)  : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील नगरसुल येथे महाराष्ट्रचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा रविवार, दि.5 माघ पौर्णिमा (दांडी पौर्णिमा) रोजी मोठी शांततेत संपन्न होत असतांना येवला तालुक्याचे लोकनेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी खंडेराव महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी मंदिराचे भगत रघुनाथ भडके, दत्तु मडके, सुकदेव मडके, उत्तर मडके, विश्वनाथ भडके यांनी भुजबळ  यांचा भंडारा देऊन सत्कार केला. त्यानंतर भुजबळ यांनी बारा गाड्याचे दर्शन घेतले. याप्रसंगी नगरसुल माजी सरपंच प्रसाद पाटील, साहेबांचे पी. ए. महेश पैठणकर, राष्ट्रवादी युवानेते सुनिल पैठणकर, विनोद पाटील, मकरंद सोनवणे, उपसरपंच अविनाश पैठणकर, राजेंद्र पैठणकर,सतिष पैठणकर, डॉ कमलाकर पैठणकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भुजबळ यांचे यात्रेच्या बारा गाड्या समोरी, आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचच उंच पताका भाविकांचे लक्ष वेधून घेतले.  यात्रेला चोहोबाजूने पाहता जनसमुदाय दिसत होता. बारागाडी  ओढत असताना ग्रामस्थांनी भंडाऱ्याची तसेच खोबऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट अशा घोषणा देत परिसर  दुमदुमून टाकला. भाविक भक्तीरसात न्हाऊन निघालेला यावेळी पहावयास मिळाला. 

हेही वाचा:

Back to top button