नाशिक : आदित्य ठाकरेंची उद्या नाशिकरोडला जाहीर सभा | पुढारी

नाशिक : आदित्य ठाकरेंची उद्या नाशिकरोडला जाहीर सभा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी (दि. 6) नाशिक दौर्‍यावर येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6 ला नाशिकरोड येथे त्यांची आनंदऋषिजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात जाहीर सभा होणार आहे. यात ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दिली.

सभेच्या नियोजनाबाबत शालिमार येथील शिवसेना कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना करंजकर बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, मनपा माजी गटनेते विलास शिंदे, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांची युवकांमध्ये चांगली क्रेझ आहे. त्यामुळे ते या घटकांविषयी काय बोलतात, याची सर्वांना उत्सुकता आहे, असे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितले. गद्दारांनी दगा दिल्यानंतरही न डगमगता आदित्य ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवल्याने सर्वांनाच बळ आल्याचे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर नमूद केले. सभेला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनपाचे माजी गटनेते विलास शिंदे यांनी केले.बैठकीस वैभव ठाकरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, भगवान आडोळे, संपत चव्हाण, माजी महापौर नयना घोलप, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, केशव पोरजे, भय्या मणियार, सुनीता कोठुळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button