निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या महिला दीर्घायुषी ! | पुढारी

निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या महिला दीर्घायुषी !

मुंबई : अमेरिकेतील एका संशोधनानुसार, ज्या महिला जास्त काळ निसर्गाच्या सान्निध्यात राहतात, त्यांना दीर्घायुष्य मिळते. हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा यासंदर्भातील शोधनिबंध एन्व्हायर्मेटल हेल्थ पर्पेक्टिव्हसमध्ये सादर करण्यात आला आहे.

यात दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण शहरीकरण झालेल्या परिसरात राहणाऱ्या महिलांचे आयुष्य निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यमानापेक्षा कमी असण्याची शक्यता असते. या शोधासाठी सुमारे एक लाख महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले.. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विशेषतः कर्करोग आणि श्वसनरोगाने ग्रस्त असलेल्या बहुतेक महिला शहरी भागातील होत्या. या महिलांच्या घराच्या जवळपास झाडे, मोकळी हवा, शांतता या बाबी उपलब्ध नव्हत्या. दुसरीकडे निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या महिलांच्या घराच्या आसपास प्रदूषणाची मात्रा खूपच कमी होती. या महिलांमध्ये मानसिक तणावही कमी होता.

Back to top button