नाशिक : शहरात तब्बल ‘इतके’ परवानाधारक शस्त्रधारी

पिस्तूल परवाना,www.pudhari.news
पिस्तूल परवाना,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील एक हजार ३४० नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ पोलिस आयुक्तालयाकडून शस्त्र परवाना घेतला आहे. २०१६ ते २०२२ या सात वर्षांच्या कालावधीत १३३ नागरिकांना शस्त्र वापरण्याचा परवाना देण्यात आला आहे. २०२१ पासून नवीन अर्जदारास शस्त्र परवाना वितरित केलेला नसल्याचे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सांगण्यात आले.

जिवाला धोका असल्यास नागरिक स्वरक्षणासाठी शस्त्र वापरण्याचा परवाना मागू शकतात. सुरुवातीस ही बाब स्थानिक पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्याची शहानिशा केली जाते. त्यानंतर वरिष्ठ स्तरावर शस्त्र परवानाचा प्रस्ताव दिला जातो. त्यानंतर शस्त्र परवाना वितरित होतो. त्यानुसार सात वर्षांत १३३ जणांना शस्त्र परवाना वितरित करण्यात आला आहे. सर्वाधिक ३१ परवाने २०१९ मध्ये देण्यात आले आहेत. २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक असल्याने अनेकांनी शस्त्र परवाने घेतल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीत अनेकांना धमक्या येत असल्याने त्यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मागितला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शस्त्र परवाना मागण्याचे प्रमाण घटल्याचे आकडेवारीवरून दिसते. २०२० मध्ये २५, तर २०२१ व २०२२ मध्ये शून्य शस्त्र परवाने वितरित झाले आहेत. शस्त्राचे परवाने घेण्यात राजकारणी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गर्भश्रीमंत व्यक्तींचा समावेश सर्वाधिक आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार आवश्यकता असल्यावरच अर्जदारास शस्त्र परवाना वितरित करता येताे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नागरिक शस्त्र मिरवण्यासाठी किंवा गरज नसतानाही शस्त्र परवान्याची मागणी करतात. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव नाकारले जात असतात. २०२१ पासून शहरात एकालाही नव्याने शस्त्र परवाना वितरित झालेला नसल्याचे आकडेवारीवरून दिसते.

विनापरवाना शस्त्र बागळणे किंवा त्याचा वापर करणे गुन्हा आहे. त्यामुळे शस्त्र वापरण्यासाठी नागरिक पूर्वपरवानगी घेत असतात. परवाना मिळाला तरी त्या शस्त्रांचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करता येत नाही किंवा त्याचा अनावश्यक वापरही करता येत नाही. असे केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात असतात.

वर्षनिहाय वितरित केलेले परवाने

२०१६ —- ३१

२०१७ —- १७

२०१८ —- २१

२०१९ —- ३९

२०२० —- २५

२०२१ —- ००

२०२२ —- ००

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news