Maharashtra MLC Election Results : कोकण शिक्षक मतदार संघ मतमोजणीला प्रारंभ (Video)

Maharashtra MLC Election Results : कोकण शिक्षक मतदार संघ मतमोजणीला प्रारंभ (Video)

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीला नवी मुंबईत नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सुरूवात झाली आहे. एकूण 28 टेबलवर मतमोजणी होत असून सर्व 98 मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत. प्रत्येक टेबलवर 1250 मतपत्रिका देण्यात येतील, त्यानंतर वैध व अवैध मतांची मोजणी होईल.

महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील (शेकाप) आणि भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत होणार आहे. भाजपने म्हात्रे यांच्यासाठी चांगलीच कंबर कसली होती. अनेक राजकीय नेत्यांच्या शाळा, महाविद्यालये कोकणात असल्याने मतदार कोणाला संधी देणार हे मतमोजणी नंतर समोर येणार आहे. मतमोजणी केंद्रावर विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर देखील उपस्थित आहेत.

कोकण मतदार संघासाठी एकूण 98 मतदान केंद्रे होती. आतापर्यंत मतपेट्या उघडण्याच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. तिसऱ्या फेरीत मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत. 2 हॉलमध्ये एकूण 28 टेबलवर मतमोजणी सुरू असून प्रत्येक टेबलवर 1250 मतपत्रिका देण्यात येतील, त्यानंतर वैध व अवैध मतांची मोजणी होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari (@pudharionline)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news