नाशिक : मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू, अशा आहेत प्रवेश पात्रता अटी | पुढारी

नाशिक : मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू, अशा आहेत प्रवेश पात्रता अटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) मुलींना प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत मुलींसाठी भारतात पहिली शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिकला पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मंजूेर झाली आहे. या संस्थेत प्रथम सत्रासाठी प्रवेशेप्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी दिली.

महाराष्ट्रातील मुलींचे एनडीएतील प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी ही सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था जून 2023 पासून सुरू होणार आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी www.girlspinashik.com या संकेतस्थळावर विद्यार्थिनींनी 12 मार्चपर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने 9 एप्रिलला लेखी परीक्षा होणार असून, पात्र विद्यार्थिनींची मुलाखत घेण्यात येणार आहे.

सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी 30 विद्यार्थिनींना प्रवेशासाठी शासनामार्फत जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची निवासव्यवस्था सद्यस्थितीत असलेल्या माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात (पत्रकार कॉलनी, त्र्यंबकरोड) येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थिनींनी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा, असे आवाहनही कापले यांनी दिली आहे.

प्रवेश पात्रता अटी

– महाराष्ट्राची रहिवासी व अविवाहित असावी

– जन्म 1 जुलै 2006 ते 31 डिसेंबर 2008 दरम्यान झालेला असावा

– इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण सुरू असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 

Back to top button