

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे या वर्षी शेतीतून उत्पन्न मिळणार नसल्याच्या तणावात धरणगाव तालुक्यातील पथराड येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. किशोर सुरेश जाधव (वय ४४, रा. पथराड, ता. धरणगाव जि. जळगाव) असे त्यांचे नाव अआहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, किशोर जाधव हे काल रात्री घरी एका खाेलीत झाेपले हाेते. आज सकाळी पत्नीने आवाज दिल्यावरही त्यांनी दरवाजा उघडला नाही. शेजार्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला.
यावेळी किशोर यांनी विषारी कीटकनाशक औषधप्राशन केलेल्या अवस्थेत दिसून आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
किशोर जाधव यांच्याकडे तीन एकर शेती आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पीक खराब झाले आहे.
किशोर यांच्यावर कर्ज हाेते. अशातच पावसामुळे शेतीचे माेठे नुकसान झाले. यामुळे त्यांनी टाेकाचे पाऊल उचलले, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. किशोर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे.
हेही वाचलं का ?