नाशिक : टोमॅटोच्या ओव्हरलोड पिकअपचा अपघात टळला; छातीत धस्स करणारा व्हिडिओ व्हायरल

नाशिक : टोमॅटोच्या ओव्हरलोड पिकअपचा अपघात टळला; छातीत धस्स करणारा व्हिडिओ व्हायरल

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकरी आधीच संकटात सापडलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालु्क्यातील डुबेरेवाडी शिवारातून टोमॅटो भरुन विक्रीसाठी जाणाऱ्या ओव्हरलोड पिकअपचा अपघात थोडक्यात टळला.

पाणंद रस्त्यातून वाट काढीत मुख्य रस्त्याला लागतानात पिकअपची पुढची दोन्ही चाके वर झाली. यात चालक बालंबाल बचावला. या पिकअपचा अपघातचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडिओ बघताना छातीत धस्स होते.

शेतकऱ्यांनी ट्रॅ्क्टरच्या सहाय्याने पिकअपसह चालकाला वाचविले. या घटनेत पिकअप चालक योगेश सदगीर यानेदेखील प्रसंगावधान राखल्याचे दिसत आहे.

टोमॅटो मातीमोल विकले जात असल्याने शेतकऱ्यांची परवड झाली आहे. तरीही भांडवल खर्च का होईना सुटेल, या अपेक्षेने शेतकरी टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी पाठवत आहेत. तालुक्यातील डुबेरेवाडी शिवारातील महेश गुरकुले या शेतकऱ्याने दोन बिगे टोमॅटो केले असून 180 क्रेटस टोमॅटो भरुन पिकअप मुख्य रस्त्याला लागत असतानाच पिकअपची दोन्ही चाके वर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हे ही वाचलत का :

#26/11 : फ्रंटलाईन वर्करच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. सुजाता म्हणजेच मृण्मयी देशपांडेचा अनुभव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news