नाशिकमध्ये रस्ता चोरीला गेलाय, या रस्त्यासाठी अण्णा हजारे यांना साकडे...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव तालुक्यातील बहुचर्चित टोकडे येथील चोरीला गेलेल्या रस्ता प्रकरणाबाबत गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना कळविण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे घातले आहे.
मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात कागदोपत्री रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, हा रस्ता चोरीला गेल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी केली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता संंजय नारखेडे आणि त्यांच्या पथकाने दिवसभर फिरून रस्ता शोधला, मात्र त्या ठिकाणी त्यांना रस्ता सापडला नाही; मात्र, रस्ता आहे, असा अहवाल त्यांनीच सादर केलेला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यादेखील या प्रकरणाची शहानिशा करणार आहेत. त्यांनी माहिती दिली नाही, तर या रस्ता चोरीचे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करणार असल्याची माहिती तक्रारदार द्यानद्यान यांनी दिली होती. मात्र आता अण्णा हजारे यांना साकडे घातले असल्याने सीईओ मित्तल यावर काय कार्यवाही करतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
- डोंबिवली एमआयडीसी : वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे परिसरात भीती; प्रदुषणात वाढ
- वाळकीत रंगला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; हेलिकॉप्टरमधून मिरवणुकीवर पुष्पवृष्टी
- नाशिक : अटक वॉरंटनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ, काय आहे प्रकरण?