नाशिक ग्रामीण पोलिस दलातीलचालक पदाचा कटऑफ ४५ गुणांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील चालक पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण जाहीर झाले आहेत. खुल्या प्रवर्गात ५० पैकी ४५ गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची ‘कटऑफ’अंती पुढील चाचणीसाठी निवड झाली आहे. तर शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचा कटऑफ येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात २ ते २० जानेवारीदरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी नाशिक ग्रामीणमध्ये चालक पदासाठी २ व ३ जानेवारी रोजी उमेदवारांची कागदपत्रे पडताळून मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यात एक हजार २२ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांची मैदानी चाचणीचे गुणतालिका जाहीर करण्यात आली. त्यावर दहा उमेदवारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांचे निवारण केल्यानंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार प्रवर्गनिहाय निकाल जाहीर झाले असून, त्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. दरम्यान, शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचा ‘कटऑफ’ जाहीर होणार असून, प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करीत लेखी परीक्षेबाबत माहिती देण्यात येईल. दरम्यान, तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचा पेच कायम असल्याने भरती प्रक्रिया रखडणार की, नियोजित वेळापत्रकानुसार होणार याकडे उमेदवारांचे लक्ष आहे.
१९६ उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १५ चालक पदांसाठी दोन हजार ११४ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी एक हजार २२ उमेदवार चाचणीस पात्र ठरले. त्यातून गुणांकनानुसार १९६ उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
चालक पदाचा ‘कटऑफ’ असा…
प्रवर्ग पुरुष महिला माजी सैनिक
खुला ४५ ३५ ४५
अनुसूचित जाती (एससी) ३७ २५ ००
अनुसूचित जमाती (एसटी) ४१ ३७ ००
भटक्या जमाती-क (एनटी-सी) ४२ ०० ००
इतर मागासवर्ग (ओबीसी) ४२ ३१ ००
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) ३१ ३१ ००
हेही वाचा:
- सांगलीत आठही आमदार भाजपचे असतील : पालकमंत्री सुरेश खाडे
- Soundarya Sharma : एलिमिनेट होताच सौंदर्या शर्माने मारली पलटी
- जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर