Soundarya Sharma : बिग बॉसमधून एलिमिनेट होताच सौंदर्या शर्माने मारली पलटी | पुढारी

Soundarya Sharma : बिग बॉसमधून एलिमिनेट होताच सौंदर्या शर्माने मारली पलटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १६ या शोचा फिनाले चर्चेत आहे. या शो चा विजेता होण्यासाठी काहीच आठवडे बाकी आहेत. (Soundarya Sharma) दरम्यान, या शोची स्पर्धक सौंदर्या शर्मा हिला घरातून बाहेर व्हावं लागलं. अर्चना आणि निमृत कौरने प्रयत्न देखील केला की, सौंदर्या घरामध्ये टिकून राहावी. पण तसे होऊ शकले नाही. घरातून बाहेर जाता जाता अर्चनाने सौंदर्याला सांगितले की, ती कोणत्याही परिस्थितीत गौतमला भेटणार नाही. (Soundarya Sharma)

सौंदर्या शर्मा शोतून बाहेर

एलिमिनेशननंतर एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सौंदर्या म्हणाली की, ती एलिमिनेशन विषयी जरादेखील चिंतेत नाही. ती म्हणाली की, हा निर्णय जनतेच्या वोटिंगच्या माध्यमातून झाले नाही तर घरवाल्यांनी मिळून तिला बाहेर केलं. माझा प्रवास कसाही असो तो खूप शानदार होता. मला कुणाबद्दलही काहीही तक्रार नाही.

सौंदर्याने मारली पलटी

सौंदर्या म्हणाली की, मी कधीही कोणत्याही ग्रुपमध्ये सहभागी झाले नव्हते. जेव्हा मी घरातून बाहेर गेले, तेव्हा वेगवेगळ्या लोकांसोबत राहिले. हा एक रिॲलिटी शो होता, ज्यामध्ये प्रत्येकाचा एक गेम प्लॅन आहे. असा परिस्थितीत एका मजबूत प्लेयरला बाहेर काढून त्यांनी योग्य केलं.

गौतमसोबतच्या नात्याविषयी सौंदर्या म्हणते – ‘मैं आतादेखील एका व्यक्तीच्या रूपात गौतमचा सन्मान करते. मला माहिती नव्हतं की, तिच्या किंवा गौतमविषयी बाहेर काय म्हटलं गेलं. कारण, मी आताच शोतून बाहेर आले आहे. गौतमने मला सांगितले की, मी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नये. कॅमेरासमोर लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी लोक काहीही म्हणू शकतात. मी त्या लोकांसारखी नाही, जे लोकांचा अपमान करतात किंवा घाणेरडे कमेंट करतात. मी आधी गौतमशी बातचीत करेन, मग काही प्रतिक्रिया देईन.

Back to top button