नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम तर ‘बदला’ व्दितीय

नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम तर ‘बदला’ व्दितीय
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सांस्कृतिक कार्य संचनालय आयोजित १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर संस्थेच्या 'अजब लोठ्यांची महान गोष्ट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तर समिज्ञा बहुद्देशीय नाशिक संस्थेच्या 'बदला' या नाटकाला व्दितीय आणि आत्मा मालिक, कोकमठाण संस्थेच्या 'आम्ही ध्रुव उद्याचे' या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचलनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या तीन नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झालेली आहे.

दिग्दर्शन प्रथम पारितोषिक आरती अकोलकर (नाटक : अजब लोठ्यांची महान गोष्ट), व्दितीय पारितोषिक पूनम पाटील (नाटक : बदला), तृतीय पारितोषिक सुजीत जोशी (नाटक : अद्भूत गोष्ट). प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक चेतन ढवळे (नाटक : बदला), व्दितीय गणेश लिमकर (नाटक : एक रात्र गडावर). रंगभूषा प्रथम पारितोषिक दिपाली अडगटला (नाटक : एक रात्र गडावर), व्दितीय माणिक कानडे (नाटक : चिमटा), नेपथ्य प्रथम पारितोषिक ऋषिकेश पाटील (नाटक : झुंझार), व्दितीय पारितोषिक प्रविण नेरके (नाटक : सुखी सदऱ्याचा शोध).

वीर दीक्षित (अद्भूत बाग), अनुजा कुलाळ (नाटक : हे जीवन सुंदर आहे), निकिता वरखडे (नाटक : दप्तर), आर्या देखणे (नाटक : अजब लोठ्यांची महान गोष्ट), ईश्वरी बकरे (नाटक :तहानलेली), मनस्वी लगड (नाटक : सुखी सदऱ्याचा शोध), सम्यक सुराणा (नाटक : अजब लोठ्यांची महान गोष्ट), आर्यन बोलीज (नाटक : बदला), साैरभ क्षिरसागर (नाटक : अभिप्राय), भार्गव जोशी (नाटक : झुंझार) या बालकलाकरांना गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाली. श्लोक नेरकर (नाटक : बदला), गायत्री रोहोकले (नाटक : अजब लोठ्यांची महान गोष्ट) उत्कृष्ट अभिनयसाठी रौप्यपदक जाहीर झाली.

३ ते ९ जानेवारी दरम्यान परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक व माऊली सभागृह, अहमदनगर याठिकाणी स्पर्धा पार पाडली. स्पर्धेत एकुण ३० नाटक सादर करण्यात आली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शंकर घोरपडे (चाकण), गणेश शिंदे (परभणी), मंजुषा जोशी (पुणे) यांनी काम पाहिले. तर नाशिक केंद्राचे समन्वय राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news