Satyendar Jain vs Sukesh Chandrasekhar : …तर तुझी अवस्था सुशांत सिंह सारखी होईल, महाठग सुकेशचा नवीन लेटरबॉम्ब, सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप

sukesh chandrasekhar
sukesh chandrasekhar

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना पत्र लिहून आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर धमकी आणि मानसिक छळ केल्याचा आरोप (Satyendar Jain vs Sukesh Chandrasekhar) केला आहे. चंद्रशेखर याने आपल्या नवीन पत्रात असा दावा केला आहे की, आप नेते आपल्याला त्रास देत आहेत आणि आपल्यावर दाखल केलेले खटले मागे घेण्यास सांगत आहेत. सुकेशने आरोप केला आहे की, तुरुंगात डांबलेले 'आप'चे सदस्य सत्येंद्र जैन यांनी आपल्याला बोलावले आणि दोघांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी 48 तासांचा अवधी दिला. कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आपला छळ होत असल्याचेही त्याने पत्रात लिहिले आहे.

त्याने पत्रात म्हटले आहे की, जैन (Satyendar Jain vs Sukesh Chandrasekhar) यांनी त्यांना सर्व स्क्रीनशॉट, चॅट आणि व्हॉईस रेकॉर्डिंग सोपवण्यास सांगितले आणि मीडिया आणि उच्चस्तरीय समितीला दिलेली विधाने मागे घेण्यास सांगितले. जैन यांनी आपल्याला दुसऱ्या तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे ते म्हणाले. जैन यांनी आपल्याला सांगितले की, तुझा इतका छळ केला जाईल की, तुला सुशांत सिंग राजपूतप्रमाणे आत्महत्या करण्यास भाग पाडले जाईल.

काही आठवड्यांपूर्वी, ठग सुकेशने दावा केला होता की त्याने 'आप'ला 60 कोटी रुपये दिले होते. त्यांचे वकील अनंत मलिक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातील उच्चाधिकार समितीने सुकेशचे म्हणणे ऐकून घेतले आणि चौकशी करावी, असे सांगितले.

दरम्यान, हाय-प्रोफाइल लोक आणि सेलिब्रिटींकडून पैसे उकळल्याप्रकरणी चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. याआधी, त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. परंतु नंतर जीवे मारण्याच्या धमक्या देऊन तुरुंग बदलण्याची वारंवार विनंती केल्यानंतर त्याला हलवण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news