नाशिक : जय भवानी रोड परिसरात महिलांचा हंडा मोर्चा | पुढारी

नाशिक : जय भवानी रोड परिसरात महिलांचा हंडा मोर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जय भवानी रोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नवीन बांधण्यात आलेला जलकुंभ त्वरित सुरू करावा, या मागणीसाठी शिवसेनेने (ठाकरे गट) हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा अधिकारी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश देशमुख, योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, नितीन चिडे, मसुद जिलाणी, माजी महापौर नयना घोलप, योगिता गायकवाड, माजी नगरसेविका सरस्वती भालेराव, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा मगर, मंगला भास्कर, स्वाती पाटील, सुवर्णा काळोगे, शोभा घटकळ, मंजूषा कदम, विद्या दाभाडे, उज्ज्वला पाटील, सुशीला यादव, सुषमा खुळगे, रूपाली आहेर, शुभांगी सुकते, चंद्रकला पवार, ममता सोरे, अरुणा राऊत, निर्मला गायकवाड, सुलभा वालझाडे, सरला पवार, मनीषा कवडे, रेणू ढकोलिया, मुन्नी चुडियाले, ओमबत्ती ढकोलिया, विजिता ढकोलिया आदी मोर्चात सहभागी झाले होते.

जयभवानी रोड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने आणि थोडाच वेळ होतो. त्यामुळे महिलावर्गाचे हाल होत आहेत. तरी महापालिकेने जादा वेळ व जास्त दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महिलावर्गाने केली.

हेही वाचा :

Back to top button