जत : मुचंडीजवळ जीप-कारच्या धडकेत सात जखमी | पुढारी

जत : मुचंडीजवळ जीप-कारच्या धडकेत सात जखमी

जत; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुचंडी-दरीबडची रस्त्यावर पायाणी वस्तीजवळ जीप व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले. याबाबत जत पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, जीप (एमएच-11- सीजी- 8059) ही अंकलगीहून अथणीकडे जात होती. कार (एम.एच. 10- बी.एल.- 5887) ही जतहून दरीबडचीला कार्यक्रमासाठी जात होती. मुचंडीजवळ पायाणी वस्तीजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. जीपमधील अंकलगी येथील माजी सोसायटी अध्यक्ष बुजरीकसो चिनंगीसो मुल्ला (वय 65) हे गंभीर जखमी झाले. कारमधील सोमनिंग महादेव जमगोंड, बाळाप्पा निंबेवा ऐवळे (वय 65), गोपाल काडप्पा ऐवळे (वय 45), भीमराव मारुती ऐवळे (वय 25), हाजिनाथ काडप्पा ऐवळे (वय40), दशरथ मंग्याप्पा ऐवळे (वय 60, सर्व रा. मेंढेगिरी) हे जखमी झाले. त्यांच्यावर जत ग्रामीण रुग्णालय येथील प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठविण्यात आले आहे.

Back to top button