नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फुटी उंच पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात | पुढारी

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फुटी उंच पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
कळवण शहरात साकारण्यात येत असलेल्या शिवस्मारकात स्थापना केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच २१ फुट पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुतळ्याची निर्मिती करत असलेले प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांची दिल्ली येथे शिवस्मारक समितीच्यावतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.
दिल्ली येथे राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे काम सुरू असून हा पुतळा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. पद्मभूषण राम सुतार आणि शिल्पकार अनिल सुतार यांनी यावेळी शिवस्मारक समिती सदस्यांना माहिती दिली. यावेळी कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते शिल्पकार राम सुतार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, तहसीलदार बंडू कापसे, दिंडोरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, कळवणचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे आदींसह राजेश पगार, अविनाश पगार, रवींद्र पगार, राकेश हिरे, गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, राहुल पगार, परेश कोठावदे, हरीश जाधव, रंजन देवरे, ललित आहेर आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button