नवी दिल्ली; वृत्तसंस्था : Kanjhawala Case : दिल्लीतील कंझावला हिट अॅण्ड रन केसमधील मृत अंजलीच्या आईने नवा आरोप केला आहे. पाचही मित्रांनी कारच्या पुढील चाकात अडकलेल्या अंजलीला तसेच फरफटत १3 कि.मी. पर्यंत नेले होते. अंजलीच्या हत्येचा हा कट होता. स्वतःला अंजलीची मैत्रिण म्हणणारी निधीही या कटात सहभागी आहे, असा आरोप अंजलीच्या आईने केला आहे.
Kanjhawala Case : पोस्टर्माटममध्ये अंजली फक्त जेवल्याचे आढळले आहे आणि कथित अपघात झाला तेव्हा स्कुटीवर अंजलीसोबत मागील सिटवर असलेल्या निधीने अंजली ही खूप दारू प्यायलेली होती, असे सांगितले होते. अंजलीला इतक्या वाईट अवस्थेत मदत न करता घरी जाऊन झोपणारी तिची मैत्रिण कशी असू शकते. अंजलीचे सगळे अवयव हाती लागले, मात्र मेंदू बेपत्ता आहे, असे कसे घडू शकते, असा प्रश्नही अंजलीच्या आईने उपस्थित केला.
हे ही वाचा :