नाशिक : शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांकडून अनियमित बससेवेचा रस्त्यावर निषेध | पुढारी

नाशिक : शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांकडून अनियमित बससेवेचा रस्त्यावर निषेध

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा

राज्य परिवहन महामंडळाच्या अनियमित सेवेमुळे तालुक्यातील चांदोरे येथील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तसेच आबालवृध्दांचे देखील हाल होत असल्याने येथील नागरिक व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यामुळे बुधवारी (दि. ४) संतापाला मोकळी वाट करुन देत आंदोलन छेडत राष्ट्रवादी काँग्रेसचे गणप्रमुख व चांदोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी थेट चांदोरे नांदगाव बसच रोखून ठेवली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील चांदोरे येथून नांदगाव येथे विद्यार्थ्यांनी बसच्या प्रवासासाठी नियमानुसार मासिक पासेस काढले आहेत. येथील नागरिकांचे देखील कामानिमित्त नांदगाव येथे दळणवळण सुरु असते. मुख्य महामार्गापासून चांदोरे हे गाव चार किलोमीटर अंतरावर असल्याने विद्यार्थी व नागरिकांना नांदगावला जाण्यासाठी चार किलोमीटर पायी चालावे लागते. विद्यार्थी तसेच नागरिकांच्या मागणीनुसार नांदगाव चांदोरे एस टी बस सुरु करण्यात आली. मात्र या बससेवा अनियमित असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. या संतापाचे रुपांतर आंदोलनात होऊन चांदोरे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शिवाजी जाधव यांचे नेतृत्वाखाली नांदगाव चांदोरे येथे बस अडवत नांदगाव आगाराचा निषेध नोंदवला आहे.

हेही वाचा:

Back to top button