इंदापूरात विजेचा शॉक लागुन सोळा वर्षीय मुलगा ठार | पुढारी

इंदापूरात विजेचा शॉक लागुन सोळा वर्षीय मुलगा ठार

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: इंदापूर शहरामध्ये विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूर शहरातील अंबिकानगर भागात स्वतःच्या घराच्या बांधकामाला पाणी देण्यासाठी हा मुलगा गेला होता आणि याच दरम्यान त्यास विजेचा झटका लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. राजवर्धन रविंद्र रजपुत असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे.

या संदर्भात चर्तुसिंग बाबुसिंग रजपुत (रा. ४० फुटी रोड इंदापूर ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रजपूत यांच्या नवीन घराचे बांधकाम अंबिकानगर, ४० फुटी रोड येथे सुरु असून त्या बांधकामास पाणी देण्यासाठी राजवर्धन गेला होता. दरम्यान पाण्याच्या नळाला मोटार जोडत असताना राजवर्धन याला विजेचा झटका लागला आणि तो बेशुद्ध पडला. लागलीच त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उचारासाठी दाखल केले; मात्र डाॅक्टरांनी त्यास मृत घोषीत केले असं फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करित आहेत.

Back to top button