नाशिक : राष्टीय बालिका दिनानमित्ताने नववधूला "सरपंच माहेरची साडी" म्हणून पैठणीची भेट; ग्रामलक्ष्मी योजनेसही प्रारंभ | पुढारी

नाशिक : राष्टीय बालिका दिनानमित्ताने नववधूला "सरपंच माहेरची साडी" म्हणून पैठणीची भेट; ग्रामलक्ष्मी योजनेसही प्रारंभ

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा

या गावातील मुलीचे लग्न झाल्यानंतर सासरी जाताना त्या नववधुला ग्रामपंचायतीच्या वतीने पैठणी भेट देण्याचा निर्णय सरपंच अश्विनी पवार, उपसरपंच अनिल जाधव, ग्रामसेवक रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याला ग्रामस्थांचे पाठबळ असायला असणे आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यानेच गावाचा विकास साधता येतो. हे नांदगाव तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त महिला सरपंच अश्विनी पवार यांनी दाखवून दिले आहे. गावात नवनवीन उपक्रम राबवत येथील ग्रामपंचायतीने तालुक्यात एक नवा आदर्श उपक्रम राबविला आहे. नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या बोराळे ग्रामपंचायतीने या नववर्षापासून म्हणजे दि. १ जानेवारीपासूनच “सरपंच माहेरची साडी” आणि “राष्टीय बालिका दिना”चे औचित्याने “सरपंच ग्रामलक्ष्मी योजना” देखील सुरू केली आहे.

ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीसाठी सरपंच अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.३) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. अश्विनी पवार यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर अनिल जाधव यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर “सरपंच माहेरची साडी” व “सरपंच ग्रामलक्ष्मी योजना” राबवण्याचा निर्णय ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकमताने घेण्यात आला. गावांतील मुलगी लग्न करून सासरी जातांना ग्रामपंचायत बोराळे कडून ११०० रुपयांची पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने लागू केलेल्या या दोन्ही योजना या नववर्षापासून १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. महिला हा कुटूंबाचा आधार व समाजाचा महत्वपूर्ण घटक असून कुटूंबात जन्म घेणारी कन्या यांना समोर ठेवून हा उपक्रम बोराळे ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा देखील गावकऱ्यांनी व्यक्त केली. तर ग्रामस्थांनी देखील आपल्याकडे ग्रामपंचायतीचा करापोटी असलेला भरणा वेळेवर करा, आणि गावाच्या विकासाला सहकार्य करा. असे आवाहन देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी सरपंच राजेंद्र पवार, ग्रामपंचयत सदस्य उज्वल सोळुंके, अश्विनी पवार, मोनाली सोळुंके, ललिता सोळुंके, सुंदराबाई मोरे, रामभाऊ मोरे आदी उपस्थित होते,

मुलगी जन्माचे स्वागत… सरपंच ग्रामलक्ष्मी या योजनेचे महत्त्व गावातील मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्याच्या उद्देशाने गावातील सुनबाईने मुलीला जन्म दिलेल्या ग्रामपंचायत बोराळे कडून ११०० रुपये प्रोत्साहन पर रक्कम भेट दिली जाईल. मुलीच्या जन्माचे ग्रामपंचायतकडून अशा प्रकारे स्वागत केले जाणार आहे.

मुलीच्या नावे विमा सुध्दा… ज्या महिलेला या योजने अंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यांची विवाह नोंदणी आवश्यक, घरपट्टी, पाणीपट्टी भरलेली हवी. ११०० रुपयाची ही भेट मुलीच्या नावाने बँकेत ती मुलगी १८ वर्ष होईपर्यंत फिक्स डिपॉझिट करण्यात येईल किंवा ११०० रुपयांची वार्षिक एलआयसी विमा काढला जाईल. पहिल्या वर्षाची रक्कम ग्रामपंचायतकडून भरण्यात येईल. पुढील रक्कम परिवाराने भरावी किंवा ११०० रुपये रक्कमेची बेबी किट भेट देण्यात येईल.

मुलीचे जन्माचे प्रमाण वाढावे व गावाकडूनच मुलीचा सन्मान व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सादर योजना राबवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकमताने घेण्यात आला आहे. – अश्विनी पवार, सरपंच, ग्रामपंचायत बोराळे, ता नांदगांव.

हेही वाचा:

Back to top button