तळेगावमध्ये पाण्याचे मीटर चोरणारी टोळी सक्रिय | पुढारी

तळेगावमध्ये पाण्याचे मीटर चोरणारी टोळी सक्रिय

तळेगाव दाभाडे (पुणे): तळेगाव दाभाडे येथे पाणी मीटर चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. तळेगाव स्टेशन भागातील वतन नगर, वनश्री नगरमध्ये आठ ते नऊ ठिकाणचे पाणी मीटर चोरीस गेले असल्याचे आढळून आले आहे. संबंधितांनी तळेगाव नगरपरिषदेला याबाबत माहिती दिली आहे.

मीटर चोरीस गेल्याने नवीन मीटर बसवण्यासाठी अर्थिक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. तसेच या परिसरात पार्किंगमध्ये असणाऱ्या दुचाकी वाहनांतील पेट्रोल चोरीचे प्रमाणही वाढले आहे. भविष्यात वाहनेही चोरीस जाण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Back to top button