जळगाव मनपात रामायण-महाभारतावरुन राजकारण पेटले | पुढारी

जळगाव मनपात रामायण-महाभारतावरुन राजकारण पेटले

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : महापालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी भाजप सदस्य व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यात वाद सुरू असतांना उपमहापौरांनी रामायणातील रावणाबद्दल बोलत रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ होता, पण त्याच्या अहंकारामूळे तो नष्ट झाला असे सांगितले. भाजपने उपमहापौरांनी प्रभु श्रीरामामाचा अपमान केल्याचा आरोप करीत त्यांनी तत्काळ व्यासपीठावरून खालती उतरावे त्यांना या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचा आरोप करीत सभागृहात जोदरदार घोषणाबाजी केली.

महासभेत व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त देविदास पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. महासभेच्या सुरवातीला महापौरांनी सदस्यांनी आयत्या वेळी प्रश्‍न उपस्थित करण्याच्या मागण्यावर चार दिवसात प्रस्ताव पाठवून लगेच महासभेची तारीख निश्‍चीत करून ते प्रस्ताव त्यात घेण्याची सांगितले. विषयपत्रीकेवरील प्रस्ताव सुरू करण्यापूर्वीच उपमहापौरांवर ठेकेदाराना कामे न करू देण्याबाबतचा आरोप त्याच्यावर करत महासभेच गदारोळ झाला. गदारोळ वाढत गेल्याने महापौरांनी महासभा अनिश्‍चीत काळासाठी सभा तहकुब केली.

सभागृहात ऑडीओक्लिपमुळे खळबळ 

उपहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर भाजपने आरोप करीत पदाधिकारी सत्तेचा दुरूपयोग करत असून कोणत्या ही ठेकेदारांची पावती मला विचारल्या शिवाय पाठवायची नाही, असा कर्मचार्‍यांवर दबाव टाकत आहे. याबाबत सदस्य मयुर कापसे यांनी थेट ऑडीओक्लिप ऐकवून सभागृहात खळबळ उडवून दिली. यावेळी मयुर कापसे यांनी महाभारतातील एक कथा सांगत ध्रुतराष्ट्राचे उदाहरण दिले.

विकास कामे होवू न देण्यासाठी हा गोंधळ- लढ्ढा 

महापालिकेत ठाकरे गटाची शिवसेनेचे महापौर, उपमहापौर असून त्यांच्या कार्याकाळात कामे होवू नये, त्यांचे श्रेय त्यांना मिळू नये यासाठी हा आज सभागृहात गोंधळ भाजपच्या सदस्यांनी घातला. प्रभागात एकच ठेकेदार काम जास्त दराने घेणे त्यावर २० टक्के कमीशन देणे. हा गैरव्यवहार थांबला पाहिजे यासाठी कर्मचार्‍यांना कोणता ही ठेकादाराची पावती आम्हाला सांगितल्या शिवाय फाडू नये, यासाठी कर्मचार्‍यास हे सांगितले होते. दैनंदिन प्रशासकीय कामकाजाची माहिती घेणे हे पदाधिकार्‍यांचे काम असून यात गैर काहीच नाही, असे शिसेनेचे जेष्ठ सदस्य नितीन लढ्ढा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

प्रभु श्रीरामचंद्रचा उपहापौरांनी केला अपमान 

घडलेल्या घटनांवर भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा म्हणाले, की उपमहापौरांनी प्रभु श्रीरामचंद्र यांचा उपमहापौरांनी अपमान केला. रामा पेक्षा रावण त्यांना श्रेष्ठ वाटत आहे. त्यांना त्यांच्या पदावर बसण्याचा अधिकार नसून त्यांनी त्या खुर्चीवर व व्यासपीठावर बसू नये. शिवसेनेचे इतर सदस्य त्यांना पाठराखण करत असल्याचा आरोप हाडा यांनी केला.

प्रभु श्रीरामचंद्र यांचा अपमान करण्याचा कोणताही उद्दीष्ट माझ्या वक्तव्यातून नव्हता. उलट रावणाची अहंकारबाबत मी बोलत होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजपकडून केला जात होता. उलट महासभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकांच्या कामाला मंजूरी मिळणार होती ते यांना होवू द्यायची नव्हती म्हणून त्यांनी हा गोंधळ केला.
– कुलभूषण पाटील, उपमहापौर 

हेही वाचा  

Back to top button