पिंपरी (पुणे): सोन्याचे दागिने बनवून देणार्‍या कारागिरांनी पळवली 16 लाखांची बिस्किटे | पुढारी

पिंपरी (पुणे): सोन्याचे दागिने बनवून देणार्‍या कारागिरांनी पळवली 16 लाखांची बिस्किटे

पिंपरी : सोन्याचे दागिने बनवून देणार्‍या कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे घेऊन पोबारा केला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत नढेनगर, काळेवाडी येथे घडला. किसन रेवजी तांबे (51, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सॅम्युअल हरजोली हक ऊर्फ दिपू शेख, रॉनी ताजोद्दीन शेख (सध्या रा. नढेनगर, काळेवाडी. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे सोन्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात आरोपी कारागीर म्हणून काम करीत होते. तांबे यांनी आरोपींकडे 16 लाख 64 हजार 883 रुपये किमतीचे दागिने बिस्किटे बनविण्यासाठी दिली. कारागीर आरोपींनी बिस्किटांचे दागिने बनवून न देता मोबाईल बंद करून पळ काढला.

Back to top button