मानव उत्थानचा उपक्रम : ’प्लास्टिक मॉन्स्टर’द्वारे शहरात जनजागृती | पुढारी

मानव उत्थानचा उपक्रम : ’प्लास्टिक मॉन्स्टर’द्वारे शहरात जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेचारशे वर्षे नष्ट न होणार्‍या प्लास्टिकचा वापर न करण्यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन व जनजागृतीचे काम ‘प्लास्टिक मॉन्स्टर’ अर्थात ‘प्लास्टिक राक्षसा’द्वारे शहरात सुरू आहे. मानव उत्थान मंचातर्फे गेल्या सहा वर्षांपासून शहरात हा उपक्रम सुरू आहे. प्लास्टिक हे पर्यावरणास किती हानिकारक आहे, हे सगळ्यांना माहीत असूनही नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर सर्रास केला जात आहे. त्यासाठी मानव उत्थान मंचातर्फे दरवर्षी नवनव्या संकल्पना घेऊन प्लास्टिकविरोधात जनजागृती केली जाते. या वर्षी ‘प्लास्टिक वॉर्म’ या संकल्पनेवर प्लास्टिक राक्षस तयार करण्यात आला आहे. ‘अर्थवॉर्म’वरून ‘प्लास्टिक वॉर्म’ची कल्पना सुचल्याचे मंचाने सांगितले. या राक्षसाची प्रतिकृती तयार करण्यासाठी जगबीरसिंग, यश भामरे, प्रशांत पीप्रीय, जकिया शेख, रिकी मोंडल, अभिनव, अथर्व यांची संकल्पना आणि परिश्रम आहेत. हा प्लास्टिकचा राक्षस नाशिक शहरात ठिकठिकाणी फिरविला जाणार असून, जगबीरसिंग, निशिकांत पगारे, प्रा. सोमनाथ मुठाळ, जाकिया शेख, चंद्रशेखर जंगले, यश भामरे हे प्लास्टिकबाबत नागरिकांचे प्रबोधन करणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button