मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ | पुढारी

मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांना आवरावे : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मंत्रालयात सर्व महापुरुषांसोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मुख्य इमारतीच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. परंतु, त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांविरोधात चुकीची टिपणी करतात अशा वाचाळवीरांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवरावे. असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नाशिकमधील औरंगाबाद रोडवरील जयशंकर फेस्टिव्हल लॉन्स बँक्वेट हॉल येथे पार पडले.

खासदार शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा, साहित्य, शेती या विषयांचे चालते बोलते विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, माजी आमदार जयवंत जाधव, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, महिला शहराध्यक्ष समता परिषदेच्या शहराध्यक्षा कविता कर्डक, बाळासाहेब कर्डक, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ॲड. शिवाजी सहाणे, संजय खैरनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, खा. पवार यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा कुटुंबीयांकडून मिळालेला वारसा कायम जपला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शेती क्षेत्रात त्यांच्या माध्यमातून क्रांती झाली. राज्यात महिला आयोगाची स्थापना केली. महिलांना आपले हक्क मिळवून दिले. राज्यघटनेला अभिप्रेत लोकशाहीवर चालणारे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे सरकार दिल्लीत आणि राज्यात अभिप्रेत आहे.

यावेळी गौरव गोवर्धने, सलीम शेख, डॉ. अमोल वाजे, योगेश निसाळ, राहुल खालकर, ॲड. सुरेश आव्हाड, यशवंत ढिकले, बाळासाहेब मते, सुरेखा निमसे, बाळासाहेब गिते, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, जीवन रायते, मुख्तार शेख, मकरंद सोमवंशी, कुणाल बोरसे, डॉ. वैभव कापडणीस आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button