Nashik : चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीचा लासलगाव भाजपकडून निषेध | पुढारी

Nashik : चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीचा लासलगाव भाजपकडून निषेध

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा 
पिंपरी-चिंचवडमधील एका महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली.  पाटलांवरील शाई फेकीच्या निषेधार्थ लासलगाव येथे भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडल आणि महिला मोर्चा कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो’, वंदे मातरम’, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या गेल्या. याप्रसंगी नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा सुवर्णा जगताप, लासलगाव मंडल महिला मोर्चा अध्यक्ष स्मिता कुलकर्णी, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष लासलगाव निलेश सालकाडे, विंचूर शहर अध्यक्ष गोरख सोनवणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विंचूर धनंजय गांगुर्डे, युवा मोर्चा लासलगाव शहर अध्यक्ष निलेश जगताप, युवा मोर्चा उपाध्यक्ष लासलगाव मंडळ मनोज धनवटे, सुनील सानप, मनोहर खीलवानी, अभिजीत लचके, बापू लचके, कैलास जैन, रंजना शिंदे, विवेक जोशी, प्रथमेश कुलकर्णी, जिल्हा सदस्य सिंधु पल्हार, ऋतुराज शिंदे, दत्तू माळी, हर्षवर्धन भुसारे, प्रमोद भुसारे, सुमन वैष्णव उपस्थित होते.

”जाणूनबुजून आणि कटकारस्थान रचून हा भ्याड हल्ला झाला असून, त्या मागचे खरे सूत्रधार लवकरच समोर येतील. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा सोयीस्कर अर्थ काढून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा काही राजकीय मंडळींचा डाव आहे. हा डाव यशस्वी होणार नाही. कारण चंद्रकांत पाटील यांच्या मनातील महापुरुषांबद्दल असलेली निष्ठा आणि आदर सर्वांनाच माहीत आहे.

– सुवर्णा जगताप, नाशिक जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष

हेही वाचा :

Back to top button