artificial intelligence : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतातील ट्रॅक्टरमध्ये

artificial intelligence
artificial intelligence
Published on
Updated on

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) नजीकच्या काळात उद्यमशीलतेचे मापदंडच बदलून टाकेल, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. कंपन्या आणि ग्राहकांना याचा मोठा फायदा होईल, यात वादच नाही. याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अमेरिकेतील एका कंपनीने आगळ्यावेगळ्या ट्रॅक्टरची नवी बॅच बाजारात आणली आहे. या शेती ट्रॅक्टरमध्ये सहा कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते मार्गात येणारे अडथळे ओळखून मार्ग काढतात.

ट्रॅक्टरवर बसवलेले कॅमेरे पिकांमधील तण पाहतात आणि त्यामध्ये कीटकनाशके फवारतात. त्यामुळे धान्याची नासाडी टळते. मुख्य म्हणजे हे कॅमेरे त्यांचे सेटिंगदेखील आपोआप बदलण्याएवढे सक्षम आहेत. अमेरिकेतील मॅकिन्से या सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले की, यावर्षी जगभरातील 50 टक्के कंपन्यांनी ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) वापरण्याला प्राधान्य दिले आहे. 2017 मध्ये अशा कंपन्या केवळ 20 टक्के होत्या. तंत्रज्ञान कंपन्यांसाठी कठीण काळात कृत्रिम बुद्धिमत्ता हा घटक महत्त्वाचा ठरला आहे.

पिचबुक डेटा फर्मनुसार, 2022 मध्ये उद्यम भांडवलदारांनी कृत्रिम बुद्धिमत्तेत तज्ज्ञ असल्याचा दावा करणार्‍या कंपन्यांमध्ये 5.51 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त खासगी गुंतवणूक असलेल्या 28 नवीन कंपन्या समोर आल्या आहेत. म्हणजेच नजीकच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) विविध उद्योगांचा अवकाश मोठ्या प्रमाणावर व्यापून टाकतील हे खरेच.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news