अंडी महागली; किरकोळ बाजारात ७ रुपये दर (Egg Rate) | पुढारी

अंडी महागली; किरकोळ बाजारात ७ रुपये दर (Egg Rate)

स्वप्निल पाटील, सांगली : राज्यासह देशात गेल्या काही दिवसांत अंडी दरात (Egg Rate)  दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाच ते सहा रुपयांना मिळाणारी अंडी आता किरकोळ बाजारात सात रुपयांवर जावून पोहोचली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. अंडी दरवाढीत वाराणासी पहिल्या स्थानी असून मुंबई देशात तिसर्‍या स्थानी आहे.

अंडी हा अनेकांच्या रोजच्या खाण्यातील पदार्थ आहे. खाद्यतेल, अन्नधान्य, पालेभाज्या, फळे यांच्यानंतर आता अंडीही महागली आहेत.

अनेक अफवांमुळे कोरोना काळात अंडीच्या विक्रीमध्ये लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे त्याच्या दरात देखील घसरण झाली होती. परंतु कोरोना नंतर बाजारामध्ये अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुरवठा आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण होत आहे.

नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या आकडेवारीचा वर्षभराचा आढावा घेतल्यास वाढत गेलेल्या अंडीच्या दराचा अंदाज येऊ शकतो. या कमिटीच्या पुण्यातील आकडेवारीनुसार घाऊक बाजारात जानेवारी 2022 मध्ये 497.29 रुपये शेकडा असा दर होता. फेब्रुवारी (450.39), मार्च (411.74), एप्रिल (414.73), मे (449.94), जून (543.73), जुलै (498.39), ऑगस्ट (436.52), सप्टेंबर (465.97) ऑक्टोबर (484.13), नोव्हेंबर (572.17) आणि डिसेंबर (590) या प्रत्येक महिन्यांत फक्त मार्च महिन्याच अफवाद वगळता अंडी दरात वाढ होत गेली आहे.  तर मुंबईतील आकडेवारीनुसार हा दर जानेवारीमध्ये शेकडा 496.90 असा होता. तो डिसेंबरमध्ये 606.00 शेकडा असा झाला आहे.

हा दर घाउक बाजारातील आहे.  तर किरकोळ बाजारामध्ये एका अंड्याच दर डिसेंबरमध्ये 7 रुपयांपर्यंत जावून पोहोचले आहे. तर देशी अंडीचा दर 10 ते 12 रुपयांवर पोहोचला आहे. सिलिंडर, खाद्यतेल, डाळी इत्यादींचे वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य जनता आधीच मेटाकुटीला आली आहे. त्यात आता केल्या दोन महिन्यांत अंडी दरात जवळपास 35 टक्के इतकी वाढ झाली आहे.  त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे.

Egg Rate : निर्यात वाढल्याचे दर वाढले असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी बाजारात एक अंड्याचा तर साडेपाच ते सहा रुपये होता. हा दर आता सात रुपयांवर गेला आहे. मागणी वाढल्याने तसेच परदेशांमध्ये अंड्यांची निर्यात होत असल्याने देशात तुटवडा निर्माण होवून दरात वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

दरवाढीत मुंबई तिसर्‍यास्थानी

अंड्यांच्या दरवाढीत मुंबई देशात तिसर्‍या स्थानी असल्याचे नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या आकडेवारीनुसार दिसून येते. घाऊक बाजारात वाराणसीमध्ये 608.80 रुपये, लखनऊ 608.00 रुपये आणि मुंबई 606 रुपये शेकडा अंड्यांचा दर आहे.  त्या खालोखाल पटणा 599.20 रुपये आणि रांची 599.20 रुपये शेकडा दर असल्याचे दिसून येते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button