पिंपळनेर : महिलेची बॅग पळविणाऱ्या परराज्यातील तीन महिला ताब्यात | पुढारी

पिंपळनेर : महिलेची बॅग पळविणाऱ्या परराज्यातील तीन महिला ताब्यात

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
वर्दळीच्या ठिकाणी महिलेची बॅग हिसकावून पलायन करणाऱ्या परराज्यातील महिलांच्या टोळीला पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. टोळीतील तिघां महिलांकडून १२ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळूंखे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कल्पना रघुनाथ गायकवाड (५०,रा. चिंचपाडा, ता. साक्री) या दुपारी साडेबारा वाजता पिंपळनेर गावातील बसस्थानक परिसरातील स्टेट बॅंक जवळील तुलसी सुपर शॉप मधुन जीवनावश्यक वस्तू खरेदी करून घराकडे जात असताना त्यांच्याजवळील  दहा हजार रुपयांची रोकड असलेली हॅण्डबॅग तीन महिलांनी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी फिर्यादी कल्पना गायकवाड यांनी तातडीने पिंपळनेर पोलिसात तक्रार दाखल केली. फिर्याद दाखल होताच सचिन साळूंखे आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. संध्याकाळी पोलिसांनी काही तासातच नुंज्या संदीप सिसोदीया, सगुना अजबसिग सिसोदीया, भारती महादु सिसोदीया (सर्व रा.राजगड (मध्यप्रदेश) या तिघां संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडील रोकडची हिसकावलेली बॅग आणि रोकड मिळून आली. तिघां परप्रांतीय महिलांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. एम. मालचे पुढील तपास करित आहेत. तर पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक, किशोर काळे, डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन साळूंखे, पीएसआय बी.एन.मालचे, हिराबाई ठाकरे, निलेश महाजन, सोमनाथ पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा:

Back to top button