पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट | पुढारी

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, चारोटी, उर्से या जवळपास २५ ते ३० किलोमीटर परिसरात बुधवारी (दि.२३) पहाटे ४ वाजता ३.६ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नाशिकच्या पश्चिमेला असलेल्या गावांमधील नागरिकांमध्ये घबराहट झाली आहे.

तीन दिवसांपासून पालघरमध्ये भूकंपाचे धक्के सुरू असून, सोमवारी पहाटे, मंगळवारी सकाळी ६ वाजता तर बुधवारी पहाटे ४ वाजून ४ मिनिटाला भूकंपाचा धक्का जाणवला. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भूकंपाचे धक्के बसू लागल्याने पुन्हा येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवार (दि.२३) पहाटे पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले ३.६ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले असून, नागरिक भयभीत झाले आहेत.

भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती. तर यासंबंधी अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांमध्ये भीती कायम असून, नाशिक जिल्ह्यातील नागरिकही यामुळे घाबरले आहे.

हेही वाचा :

Back to top button