कोल्हापूर : वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय | पुढारी

कोल्हापूर : वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजारामपुरी येथे वधू-वर सूचक केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्‍या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. मालक सुधीर दिगंबर वळंजुवाणी (वय 56, रा. राजारामपुरी 12 वी गल्ली) व एजंट प्रसाद संजय पाटील (25, रा. तिरपण, पन्हाळा) अशी संशयितांची नावे आहे. दोन पीडित महिलांची सुटका पोलिसांकडून करण्यात आली.

राजारामपुरी आठव्या गल्लीमध्ये सुधीर वळंजूवाणी याने सर्व जाती-धर्मांसाठी वधू-वर सूचक केंद्र सुरू केले होते. बेसमेंटमध्ये असणार्‍या या कार्यालयाच्या आडून तो गरीब व असहाय्य महिलांना पैशाच्या आमिषाने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होता. याची माहिती मिळाल्याने पोलिस मुख्यालयाकडील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने राजारामपुरी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून दोघा संशयितांना पकडले. तसेच पीडित महिलांची सुटका केली.

Back to top button