पिंपरी : कोव्हिशिल्डच्या प्रत्येक केंद्रावर फक्त 40 लस | पुढारी

पिंपरी : कोव्हिशिल्डच्या प्रत्येक केंद्रावर फक्त 40 लस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रतिबंधक लसीकरणातंर्गत आता महापालिकेच्या प्रत्येक केंद्रावर कोव्हिशिल्डच्या फक्त 40 लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. लसीचा मर्यादित साठा असल्याने प्रत्येक केंद्रनिहाय 100 लस उपलब्ध करुन देण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला होता. मात्र, या साठ्यात आणखी घट झाल्याने गुरुवारी लगेचच या निर्णयात बदल करण्यात आला आहे. महापालिकेच्या 8 केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या प्रत्येकी 100 लस देण्याचे नियोजन बुधवारी करण्यात आले होते.

कोव्हॅक्सिनच्या प्रत्येकी 100 लस

पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाने गुुरुवारी प्रत्येक केंद्रावर कोव्हिशिल्डच्या प्रत्येकी 40 लस तर, कोव्हॅक्सिनच्या प्रत्येकी 100 लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ते 14 वयोगटांतील मुलांसाठी देण्यात येणारी कोर्बेव्हॅक्स लस न मिळाल्याने कोणत्याही केंद्रांवर ही लस उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Back to top button