नाशकात उद्यापासून ‘महापेडिकॉन-2022’चे आयोजन | पुढारी

नाशकात उद्यापासून ‘महापेडिकॉन-2022’चे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स शाखा नाशिक आणि महाराष्ट्र स्टेट ब्रँच ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महापेडिकॉन- 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे.

18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या या परिषदेत राज्यभरातून बालरोगतज्ज्ञ सहभाग नोंदविणार आहेत. ‘लेटस व्हेज दी मॅजिक व्यूईथ दि लॅजिक’ या संकल्पेनवर ही परिषद होत असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. मिलिंद भराडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. लहान मुलांचे आजार बदलत चालले असून, आता मुलांमध्ये स्थूलपणा, डायबिटीस, एकाकीपणा वाढताना प्रामुख्याने दिसत आहे. या विषयावर या कॉन्फरन्समध्ये मंथन होणार असल्याचे डॉ. भराडिया यांनी सांगितले. परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर 44 व्याख्याने, गटचर्चा, परिसंवादाचे आयोजन केले आहे. राज्यातील व देशातील 200 तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करतील. आठ कार्यशाळांपैकी सहा कार्यशाळा मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात होणार असून, त्यामध्ये डॉक्टरांसह परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ सहभागी होणार आहे. तर दोन कार्यशाळा अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे डॉ. सुशील पारख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याचे डॉ. रवि सोनवणे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. पुरुषोत्तम देवी तसेच डॉ. श्याम चौधरी यांच्या संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमांबद्दल माहिती दिली.

हेही वाचा:

Back to top button