पालकमंत्री दादा भुसे : गरिबांसाठी लवकरच आरोग्य कक्षाची उभारणी | पुढारी

पालकमंत्री दादा भुसे : गरिबांसाठी लवकरच आरोग्य कक्षाची उभारणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात कोणतीही कुचराई होऊ नये. शाळकरी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करत ज्यांना चष्म्याची गरज आहे, त्यांना सीएसआर फंडातून आपण ते उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर गरीब रुग्णांची तपासणी व उपचारासाठी प्रसंगी मुंबईत उपचार करावे लागले तरी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी लवकरच आरोग्य कक्षाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व उपचारासाठी नाशिक येथे स्वतंत्र आरोग्य कक्ष स्थापन केला जाणार असून, या कक्षामार्फत रुग्णांना आवश्यक ती सर्व सेवा दिली जाईल. जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीच्या अखेरच्या टप्प्यात ना. भुसे यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या विविध खात्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्राथमिक बैठक झाली असली तरी महिनाभरात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. मात्र, त्यावेळच्या बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत करण्यात आलेल्या सर्व सूचना व मार्गदर्शनाने कामांना प्रगती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button