पुण्यात 6 हजार ट्रकचालक राष्ट्रीय परवानाधारक | पुढारी

पुण्यात 6 हजार ट्रकचालक राष्ट्रीय परवानाधारक

पुणे : देशांतर्गत मोठमोठ्या ट्रकचालकांच्या माध्यमातून मालवाहतूक करण्यात येते. त्याकरिता मालवाहू ट्रकचालकांना राष्ट्रीय परवाना (नॅशनल परमिट) आवश्यक असतो. असा परवाना घेतलेल्या ट्रकचालकांची शहरातील संख्या 6 हजार 213 इतकी आहे. सध्याच्या काळात मालवाहू ट्रक, कंटेनरच्या माध्यमातून मालवाहतूक करण्यात येत आहे.

या राज्यातून त्या राज्यात वाहतूक करण्यासाठी ट्रकचालकांकडे राष्ट्रीय परवाना आवश्यक असतो. हाच राष्ट्रीय परवाना पुण्यात 6 हजार ट्रकचालकांनी घेतल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 3 हजार 605 ट्रकचालकांनी हा राष्ट्रीय परवाना घेतला आहे. ही नोंद ‘आरटीओ’कडे चालू वर्षात करण्यात आली आहे.

परवाना नसेल तर?
मोटार वाहन कायदा 66, 192 ब नुसार देशांतर्गत मालवाहतुकीसाठी ट्रकचालक-मालकांना राष्ट्रीय परवाना (नॅशनल परमिट), तर राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी गुड्स परवाना आरटीओ कार्यालयातून काढणे अनिवार्य आहे. परवाना न काढल्यास वाहनचालकांवर दंडात्मक आणि वाहनजप्तीची कारवाई करण्यात येते.

काय आहे परवान्याचा फायदा?
वाहतूकदारांना मालवाहतूक करण्यासाठी या राज्यातून त्या राज्यात जावे लागत असते. प्रत्येक राज्यात जाताना त्या त्या राज्याचा परवाना आवश्यक असतो. मात्र, असा परवाना दरवेळी घेण्यासाठी वाहनचालकाला वेळ मिळत नसतो. त्या वेळी राष्ट्रीय परवाना महत्त्वाचा ठरतो. राष्ट्रीय परवाना असल्यास वाहतूकदार या राज्यातून त्या राज्यात बिनदिक्कत वाहतूक करू शकतो. तसेच, टॅक्सदेखील कमी लागतो.

शहर राष्ट्रीय परवानासंख्या – आरटीओला मिळालेला महसूल
पुणे 6213 10,25,14,500
पिंपरी-चिंचवड 3605 5, 94, 82, 500
बारामती 896 1, 47, 84, 000
अकलूज 709 1, 16, 98, 500
अकोला 346, 57, 09,000
अहमदनगर 1595 2, 63, 17, 500

 

Back to top button