नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी | पुढारी

नाशिक : त्र्यंबकला कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी दुपारी चंद्रग्रहणाचा पर्वकाल साधण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ग्रहण कालावधीत त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. कुशावर्तावर साधकांनी तीर्थात उभे राहत जप केला. ग्रहणमोक्षानंतर स्नानासाठी कुशावर्तावर भाविकांची गर्दी उसळली होती.

मंगळवारी सायं. 4 च्या सुमारास चंद्रास ग्रहण स्पर्श होण्यापूर्वी पूजेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी परंपरेप्रमाणे दररोजची प्रदोषपुष्प पूजा उल्हास आरधी यांनी दुपारी 2 च्या सुमारास केली. त्यानंतर ग्रहण कालावधीत माध्यन पूजक डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी पूजेस प्रारंभ केला. या कालावधीत भगवान त्र्यंबकराजाची सप्तधान्य पूजा करण्यात आली. याचवेळी पालखीतून सुवर्ण मुखवटा व चांदीचा मुखवटा मंदिरात आणला. यावेळी विश्वस्त भूषण अडसरे, प्रशांत गायधनी सोबत होते. ग्रहणकालावधीत पूजा, नैवेद्य हे येथील वेगळेपण आहे. या कालावधीत गर्भगृह बंद असते. गर्भगृह उघडल्यानंतर भाविकांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे तीन मुखवटे असलेले दर्शन झाले. भगवान त्र्यंबकराजाची आरती प्रदोषपुष्प पूजक अ‍ॅड. शुभम आराधी, आकाश तुंगार, प्रदीप तुंगार, राज तुंगार आदींनी केली.

हेही वाचा:

Back to top button