जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, संशयित महिलेस अटक | पुढारी

जळगाव : फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, संशयित महिलेस अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग टाक या तरुणाची हत्या करण्यात आली. या खून प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सतकौरसिंग बावरी या महिलेला अटक केली आहे. तर यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुन्हा घडल्यापासून संशयीत महिला आरोपी सतकौर बावरी या मनमाड येथे अज्ञातस्थळी लपून होत्या. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे व महिला कर्मचारी सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिस पथक मागावर असल्याची चाहूल लागताच महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करत तिला ताब्यात घेत अटक केली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई…
अटकेतील मोहनसिंग बावरी, मोनुसिंग जगदीश बावरी, जगदीश हरीसिंग बावरी व सतकौर जगदीशसिंग बावरी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता शनिवार, दि. 5 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे, महिला पोकाँ सपना ऐरगुंटला तसेच मनमाड शहर पोस्टेचे सागर महाले आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

हेही वाचा :

Back to top button