नाशिक : न्यायाधीन बंदीच्या मृत्यूबाबत 4 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात : पठारे | पुढारी

नाशिक : न्यायाधीन बंदीच्या मृत्यूबाबत 4 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात : पठारे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंदी क्रमांक सी-5652 शेख मुक्तार शेख गफूर यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. त्या न्यायाधीन बंदीचा मृत्यू दि. 26 सप्टेंबर रोजी नाशिकच्या सामान्य रुग्णालयात झाला. याबाबत कोणास काही माहिती द्यावयाची किंवा काही हरकत असल्यास पत्राद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे 4 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन निफाड उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी केले आहे.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदी क्रमांक सी – 5652 शेख मुक्तार शेख गफूर यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील ओलगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या न्यायाधीन बंदीस दि. 24 सप्टेंबर 2005 रोजी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 176 (1) (2) (3) (4) अन्वये दंडाधिकारी चौकशी करण्याकामी नाशिकचे अपर जिल्हादंडाधिकार्‍यांच्या आदेशान्वये निफाड उपविभागीय दंडाधिकारी डॉ. पठारे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या घटनेबाबत माहिती द्यावयाची किंवा काही हरकत असल्यास 02550-241152 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा prantniphad@gmail.com या ई-मेल आयडीवर तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग निफाड, जिल्हा नाशिक- 422303 या कार्यालयात संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे डॉ. पठारे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

Back to top button